कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ले शाळा नं. १ ने स्वमालकीच्या विहीर बांधकामाचा केला शुभारंभ

03:33 PM May 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मुलांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शाळा नं. 1 या शाळेला आवश्यक असलेल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळेला स्वतःची विहीर व्हावी यासाठी गेला काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला समाजातील काही उद्योजक दाते, माजी विद्यार्थी, शिक्षक-पालक दाते यांच्या आर्थिक सहकार्यातून गुरुवार दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विहिर बांधकामाचे विधीवत भूमिपूजन करण्यात आले.सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजक सौ. सिमा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे माजी विद्यार्थी मयुरेश भाई गुरव यांच्या हस्ते विहिर जेथे निर्माण केली जाणार आहे, त्या जागेचे ठिकाणी पुजन करून भूमी पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सत्यवान साटेलकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर उपाध्यक्ष राकेश सापळे, पुरोहीत अजित दामले, गुंजन केळूसकर, समिती सदस्य संजय पिळणकर सौ. स्नेहल बागडे, सौ. विनिता सामंत, समिर परब, माजी अध्यक्ष श्रीनिवास सौदागर, तेजल तारी, गायत्री मिशाळे, कमलेश गुरव, भास्कर परब, सर्व शिक्षक-पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समित्तीच्या वतीने विहिरीच्या कामासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत केलेला सर्व दात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update
Next Article