For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ले इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

12:27 PM Jun 29, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेंगुर्ले इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
इनरव्हील क्लब वेंगुर्ला याचा सन २०२५/२६ चा पदग्रहण सोहळा बुधवारी साई डिलक्स हॉल वेंगुर्ला येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा वृंदा गवंडळकर यांनी नुतन पदाधिकारी यांना पदाची शपथ दिली.यावेळी नूतन अध्यक्षा सौ. अपर्णा बोवलेकर यांनी, चालू वर्षात राबविण्यात येणाऱ्या नवीन उपक्रमाची माहिती दिली. नवीन वर्षात रोटरी क्लबच्या ध्येयधोरणानुसार जे समाजिक उपक्रम राबविण्याचे आहेत ते नुतन कार्याकारीणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या इनरव्हील क्लबच्या पदग्रहण सोहळ्यास वेंगुर्ला इनरव्हिल क्लब २०२५-२६ च्या समितीमधील कार्यकारणी अध्यक्षा सौ. अपर्णा बोवलेकर, उपाध्यक्षा सौ सई चव्हाण, सचिव सौ. दिपाली वाडेकर, खजिनदार सौ. रेखा नाईक, आय.एस.ओ. सौ ज्योती देसाई, एडिटर सौ. अफशान कौरी, व कार्यकारिणी सदस्या वृंदा गवंडळकर, आकांक्षा परब, गौरी मराठे, मंजुषा आरोलकर, रसिका मठकर, श्रिया परब, वैभवी दाभोलकर, वंदना शितोळे, आरती गिरप, पूजा कर्पे यांचा समावेश आहे. या पदग्रहण सोहळ्या निमित्त कुडाळ इनरव्हील अध्यक्षा सौ. सानिका मदने, लायनेस अध्यक्षा सौ. पल्लवी कामत, हेमा गावसकर, उर्मिला सावंत व इतर तालुक्यातील इनरव्हील सदस्य, तसेच रोटरी क्लब वेंगुर्लाचे अध्यक्ष योगेश नाईक, प्रथमेश नाईक, आनंद बोवलेकर, डॉ. राजेश्वर उबाळे, आनंद बांदेकर व इतर रोटरी सदस्य हे उपस्थित होते. यावेळी चार्मिंग मिस इंडियाची नवी मुंबई येथे घेतलेल्या स्पर्धेत भारतातून आठ स्पर्धकातून पहिली आलेली कु किरण शीतल शरद मेस्त्री याचा सत्कार करण्यात आला. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नूतन अध्यक्षा सौ. अपर्णा बोवलेकर यांनी नवीन वर्षात रोटरी क्लबच्या ध्येयधोरणानुसार जे समाजिक उपक्रम राबविण्याचे आहेत ते नुतन कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मावळत्या अध्यक्षा सौ. मंजुषा आरोलकर यांनी सर्वांचे स्वागत केले व सेक्रेटरी सौ. ज्योती देसाई यांनी गेल्या वर्षाचा अहवाल सादर केला. शेवटी सौ. दिपाली वाडेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.