कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘दशावतार‘ चित्रपटात झळकणार वेंगुर्ल्याचा सुपुत्र

04:13 PM Sep 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले (भरत सातोस्कर)-

Advertisement

कोकणच्या लोककलेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला ‘दशावतार‘ आता मराठी चित्रपटाच्या रूपाने रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. या ‘दशावतार‘ चित्रपटात वेंगुर्ला तालुक्यातील भेंडमळा येथील सुपुत्र आणि दशावतारी कलाक्षेत्रातील खलनायक गोपाळ तेरेखोलकर यांनी भूमिका साकारली आहे. त्याला मिळालेल्या या संधीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ‘दशावतार‘ या चित्रपटाचे चित्रीकरण वालावल, वेतोरे, केळूस, धामापूर, सरंबळ या भागात झाले असून यामध्ये ज्येष्ठ सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्यासारखे दिग्गज अभिनेते कार्यरत आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संजय लाड, संतोष रेडकर, दादा राणे-कोनस्कर, यश जळवी, गोपाळ तेरेखोलकर व ज्ञानेश्वर तांडेल या दशावतारी कलाकारांचा समावेश आहे. आपल्यासाठी ही संधी अनपेक्षित असून सर्वांच्या पाठींब्यामुळेच हे साध्य झाल्याचे गोपाळ तेरेखोलकर आवर्जून सांगतो.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # dashavtar movie # konkan update # marathi news #
Next Article