For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेंगुर्ल्यात मतदार यादी पुनरिक्षणाची सुनावणी 25 सप्टेंबरपासून

03:11 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेंगुर्ल्यात मतदार यादी पुनरिक्षणाची सुनावणी 25 सप्टेंबरपासून
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर) : वेंगुर्ला तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत दावे-हरकतींवरील सुनावणीला 25 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी 8 ऑक्टोबरपर्यंत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे. महाराष्ट्रात SIR-2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी आणि दावे-हरकतींची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे.

25 सप्टेंबर रोजी भाग क्रमांक 45-वेंगुर्ला येथील 34  मतदारांची सकाळी 10 ते 12 आणि त्याच भागातील 30 मतदारांची दुपारी 12 ते 2 या वेळेत सुनावणी होईल. 28 सप्टेंबरला भाग 43 मधील 84 आणि भाग 51 मधील 43 मतदारांची सुनावणी होणार आहे.

Advertisement

29 सप्टेंबरला भाग 48-वेंगुर्ला मधील 88 आणि भाग 64-आडारी मधील 58 मतदार, तर 30 सप्टेंबरला भाग 62-आडारी मधील 89 आणि भाग 58-आडारी मधील 43 मतदारांची सुनावणी होईल.

1 ऑक्टोबरला भाग 57-परबवाडा, भाग 60-उभादांडा आणि भाग 46-वेंगुर्ला येथील मतदारांची सुनावणी होणार आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यानही विविध भागांतील मतदारांच्या सुनावण्या नियोजित आहेत.

8 ऑक्टोबर रोजी भाग क्रमांक 49-वेंगुर्ला मधील 149 मतदारांची सकाळी 10 ते 12 या वेळेत सुनावणी होणार आहे.

संबंधित मतदारांनी निर्धारित वेळेत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी हेमंत किरूळकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.