वेंगुर्ले येथील पुष्पलता होडावडेकर यांचे निधन
01:46 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वेंगुर्ले : शहरातील बॅ. खर्डेकर रोड, मारुती मंदिर परिसरातील रहिवासी पुष्पलता गुरुनाथ होडावडेकर (86) यांचे सोमवारी, 21 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
Advertisement
पुष्पलता होडावडेकर या कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक)चे कार्यकारी संचालक मोहन होडावडेकर, महाराष्ट्र वीज मंडळाचे निवृत्त कर्मचारी दयानंद होडावडेकर आणि वेंगुर्ला बाजारपेठेतील ‘स्फूर्ती अन्न व फळपदार्थ केंद्रा’चे मालक सचिन होडावडेकर यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement