"नवरात्री ९ X ९ मिशन" द्वारे तंदुरूस्ती व आरोग्याचा जागर
वेंगा फिटनेस फायटर ग्रुप चा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम
वेंगुर्ले -
जागर भक्तीचा...जागर शक्तीचा.. जागर आरोग्याचा...सुदृढ आरोग्यासाठी माणसाने दिवसातून किमान काही वेळ चालावे किंवा धावावे गरजेचे असून समाजामध्ये व्यायामाविषयी जनजागृती करणे या उद्देशाने वेंगा फिटनेस फायटर ग्रुप तर्फे यावेळी सलग तिसऱ्या वर्षी "नवरात्री 9 X 9 मिशन" वाँक / रन म्हणजेच तंदुरूस्ती व आरोग्याचा जागर आयोजित केला आहे. जास्तीत जास्त लोकांचा या मिशनमध्ये सहभाग असावा यासाठी आगळीवेगळी युनिक पद्धत आयोजनामध्ये वापरण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.वेंगुर्ले येथील या पत्रकार परिषदेला डॉ. राजेश्वर उबाळे, प्रदीप वेंगुर्लेकर, शिवदत्त सावंत आदी उपस्थित होते. वेंगा फिटनेस फायटर हा ग्रुप वेंगुर्ल्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा फिटनेस बाबत जागृतीसाठी केलेला ग्रुप आहे. या ग्रुप तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो ज्यामध्ये ९ दिवस आपण त्यामध्ये रोज ३ किमी पासून पुढे कितीही कि.मी. आपल्या वेळेनुसार चालणे आहे. तसेच चालण्याचे ठिकाण हे तुमचे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर असू शकते देशात किंवा देशाबाहेर पण असू शकते. फक्त त्याची नोंद आमच्या ग्रुप वर करणे आवश्यक आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत चे रेकॉर्ड ठेवले जाईल. असे केल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी रविवारी त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतला जाईल.या कार्यक्रमाचे स्वरूप मध्ये त्यांना एक सुंदर टी-शर्ट तसेच एक सुंदर मेडल आणि एक सर्टिफिकेट देण्यात येईल. हा कार्यक्रम वेंगुर्ला येथे कॅम्पमध्ये घेण्यात येणार आहे.या मिशन कालावधी फिटनेस बद्दल तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आणि योगाचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन पण होणार आहे. सत्कार समारंभात मेडल देण्यात येईल. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी व्ही. प्रदीप ७४२०८०८४१६ किंवा ९४२०७४२४४० या मोबाईल नंबर वरून किंवा https://forms.gle/DMDrgoRcPS9qWvAJ9 या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे.या कार्यक्रमाची नोंदणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत २०० लोकांनी यांची नोंद केली आहे ते सर्व वेंगुर्ला आणि इतर जिल्हा तसेच देशाबाहेर चे पण आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मिशन मध्ये सहभागी व्हावे आवश्यक आहे. जे अजून काहीच व्यायाम करत नाहीत त्यांनी किमान चालण्याचा व्यायाम सुरु करावा. थोड चालणा-यांनी जरा जास्त व नियमित चालावे तसेच जलद चालावे तरच हृदयाला व शरिराला ते फायदेशीर आहे. हे सर्वांना समजावे हा या मिशनचा उद्देश आहे त्यामुळे प्रत्येकाने सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ. मणचेकर यांनी केले आहे.