व्हेनेझुएला अध्यक्षांचा भारत दौरा लवकरच
06:22 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज पुढील आठवड्यात भारताला भेट देण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी शनिवारी सांगितले. त्यांच्या या भेटीदरम्यान होणाऱ्या चर्चेत तेल पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सुमारे 303 अब्ज बॅरल तेलसाठ्यासह व्हेनेझुएला हा सौदी अरेबिया आणि अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश मानला जातो. तथापि, अनेक वर्षांच्या अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि सरकारी गैरव्यवस्थापनामुळे तेथील तेल उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. आता अमेरिका आणि व्हेनेझुएला दोघेही भारतासोबत करार करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीत सतत वाढ होण्यास मदत होणार आहे.
Advertisement
Advertisement