‘वेलिंगकर सत्य, सत्याचा विजय निश्चित’!
वेलिंगकरांच्या पाठिमागे समर्थक खंबीरपणे : कारवाई झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा, हजाराहून अधिक हिंदू एकवटले म्हापशात
म्हपसा : प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी कोणताच गुन्हा केलेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य भारतीय घटनेतील मत स्वातंत्र्याच्या अधिकारानुसारच केले आहे. शवाबद्दलचा वाद मिटवावा, ही त्यांची मागणी भारतीय लोकशाहीनुसारच आहे. वेलिंगकर सत्य असून सत्याचा विजय निश्चित आहे. मात्र वेलिंगकरांच्या बाबतीत काही अघटित घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्यास सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरुन कायदा हातात घेतील, असा वेलिंगकर याचे समर्थक, हिंदू बांधवांनी काल रविवारी म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ घेतलेल्या जाहीर सभेत दिला. हिंदू व ख्रिश्चनांमध्ये तिसरी शक्ती फूट पाडू पाहत आहे. गेले दोन दिवस याच लोकांनी रस्त्यावर आंदोलन कऊन सामान्य लोकांना त्रास दिला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी या जाहीर सभेत करण्यात आली. या सभेला एक हजाराहून अधिक हिंदू बांधव उपस्थित होते. सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गोव्यात अशांती निर्माण कऊ नका : जयेश थळी
हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी म्हणाले की, राज्यातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांमधील एकोपा तिसरी शक्ती बिघडवू पाहत आहे. शांत राज्य अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डीएनएची मागणी कायद्याला धऊन असल्याने ती होऊ शकते. याचा फायदा घेऊन ख्रिस्ती बांधवांना भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी शांततेत राहावे, उगाच आंदोलन करुन सामान्य जनतेला त्रास देऊ नका. हिंदूना टार्गेट केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही थळी यांनी दिला.
हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना कसल्या भावना
सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय नाईक म्हणाले की, भगवान परशुरामाने निर्मिती केलेल्या या भूमीत बाहेरुन आलेल्यांनी हिंदूंवर अत्याचार केले. हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदूंना बाटविले, त्यांच्या भावना कसल्या दुखावतात. आज आम्ही प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या प्रेमापोटी येथे एकत्रिक आलेलो आहोत.
वेलिंगकर म्हणजेच सत्य, सत्याचा विजय निश्चित
धर्म म्हटले की सत्य आणि सत्याचा विजय निश्चित आहे. आम्ही सर्वजण सत्याच्या बाजूने म्हणजेच वेलिंगकर सरांच्या बाजूने आहोत. वेलिंगकर सरांची मागणी योग्य असून कायद्याला धरुन आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्यास आम्ही समस्त हिंदू बांधव रस्त्यावर उतऊ असा इशाराच नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी मारुती मळीक, माजी शिवसेना राज्यप्रमुख रमेश नाईक, संदीप पाळणी, सौ. रोशन सामंत, प्राचार्य गजानन मांद्रेकर, सुजन नाईक, गणेश माटणे, ऊपेश सावंत यांनी आपले विचार मांडले.