Ratnagiri : राजापुरातील नदीपात्रात भरतीच्या पाण्यात अडकली वाहने
राजापूर वार्ताहर
राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीतील गाळ उपशामुळे नदीपात्र खोल झाले असून भरतीचे पाणी नन्हेसाहेब पुलापर्यंत येत असल्याने खर्ली नदीपात्रात उभ्या करण्यात येणाऱया गाड्या पाण्याखाली जाण्याचे पकार घडत आहेत. बुधवारी अशापकारे तीन ते चार वाहने भरतीच्या पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची धावपळ उडाली.
पूर्वी उन्हाळी हंगामात वैंशंपायन गुरूजी पुलापर्यंत येणारे भरतीचे पाणी आता थेट नन्हेसाहेब पुलापर्यंत येत आहे. उन्हाळी हंगामात कोदवली नदीपात्र कोरडे पडत असल्याने या खर्ली नदीपात्रात वाहने पार्प करण्यात येतात. पूर्वी या ठिकाणी भरतीचे पाणी येत नसल्याने दिवसरात्र वाहने उभी करून ठेवण्यात येत होती.
मात्र आता गाळ उपशामुळे भरतीचे पाणी नन्हेसाहेब पुलापर्यंत येत असल्याने खर्ली पात्रात उभी करण्यात येणारी वाहने पाण्याखाली जात आहे. बाहेरून येणाऱया वाहन चालकांना भरतीच्या पाण्याचा अंदाज नसल्याने ते बिनधास्तपणे वाहने पार्प करून जातात. मात्र भरतीच्या पाण्याखाली निम्मी चारचाकी बुडत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.