अपार्टमेंटच्या छतावर धावतात वाहने
खाली राहतात शेकडो परिवार
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केल्याने आता इंजिनियरिंगद्वारे अनेक चमत्कार आजूबाजूला घडत असल्याचे दिसून येते. आता वाहने आणि बस देखील अपार्टमेंटच्या छतावर धावताना दिसून येतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत एका चमकणाऱ्या रस्त्यावरून वाहने मोठ्या वेगात धावताना दिसून येतात. परंतु या रस्त्याखाली नजर टाकल्यास तेथे उंच इमारती असल्याचे दिसून येते.
या अपार्टमेंट्सवर हा ओव्हरब्रिज तयार करण्यात आला आहे. याचमुळे या इमारतींच्या वरून वाहने धावत आहेत. हे अपार्टमेंट देखील रिकामी असून तेथे शेकडो कुटुंबांचे वास्तव्य आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आता आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर चीनमध्ये एका इमारतीमधून रेल्वे धावत असल्याचेही समोर आले आहे. या इमारतीतच मेट्रो रेल्वेचे स्थानक निर्माण करण्यात आले होते. यामुळे या इमारतीतील लोक तेथूनच मेट्रोत चढतात आणि इच्छितस्थळाचा प्रवास करत असतात.
संबंधित व्हिडिओ चीनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून 19 हजारांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.