महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनमोड अबकारी चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूसह वाहन जप्त

10:48 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जोयडा : अनमोड अबकारी चेकपोस्टवर गोवा बनावटीची दारू, वाहन व चालकाला अटक करून कोर्टात हजर केले. अबकारी चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बोलेरो (केए 29, ए 5549) वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये गोवा बनावटीचे 55 लिटर व्हिस्की सापडली. याची किमत 81 हजार 572 रुपये होते. तसेच वाहनाची किंमत 2 लाख 65 हजार रुपये होते, असे एकूण 3 लाख 66 हजार 572 रुपये साहित्य अबकारी विभागाने जप्त केले. बोलेरो वाहनाचा चालक राजकुमार जी. पोळ (रा. खानापूर) असे असून त्याला दि. 12 रोजी संध्याकाळी दांडेली कोर्टात हजर करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई अबकारी उपआयुक्त उत्तर कन्नड जिल्ह्याच्या रुपा एम. व अबकारी उपअधीक्षक शंकरगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी सीपीआय सुनीलकुमारर यांच्या नेतृत्वाखाली अबकारी पीएसआय शिवशंकर यू. व स्टाफ सदाशिव राठोड, मुत्तप्पा बी., रवी संकन्नवर व एसएसटी तपासणी पथकाचे प्रवीण कुलकर्णी, विनोद गावडे, रामनगर पोलीस ठाण्याचे स्टाफ राजू चलवादी यांनी भाग घेऊन कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article