कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहन निर्यातीत 19 टक्के वाढ, 53 लाख वाहनांची निर्यात

06:56 AM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

Advertisement

आर्थिक वर्ष 2024-25 वर्षात भारताची एकूण वाहन निर्यात 19 टक्के इतकी वाढलेली दिसून आली. भारताने सदरच्या आर्थिक वर्षात 53.63 लाख वाहनांची निर्यात केली आहे. 31 मार्च 2024 च्या अखेरच्या आर्थिक वर्षात भारताने 45 लाख वाहनांची निर्यात केली होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरसर्स यांनी ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांची निर्यात 15 टक्के वाढीसह 7 लाख 70 हजार 364 इतकी दिसून आली. जी 2023-24 वर्षात 6 लाख 72 हजार 105 इतकी होती. भारतात तयार झालेल्या वाहनांना जागतिक स्तरावर चांगली मागणी नोंदवली जात आहे. युटिलीटी वाहनांची निर्यात 3 लाख 62 हजार 160 इतकी राहिली आहे. 2023-24 मध्ये 2 लाख 34 हजार 720 वाहनांची निर्यात झाली होती. युटिलीटी वाहनांची निर्यात 54 टक्के वाढली आहे.   दुचाकीच्या निर्यातीचा विचार केल्यास 21 टक्के वाढीसह 41 लाख 98 हजार 403 दुचाकींची निर्यात केली गेली आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षात 34 लाख 58 हजार दुचाकींची निर्यात केली होती. 3.1 लाख तिचाकी वाहनांची यादरम्यान आर्थिक वर्षात निर्यात करण्यात आली आहे. व्यावसायिक वाहनांची निर्यात 23 टक्के वाढीसह 80,986 इतकी राहिली होती.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article