For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Traffic : सोलापुरात लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी मंडईतच बसावे ; आयुक्तांचा आदेश

05:11 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
solapur traffic   सोलापुरात लक्ष्मी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी मंडईतच बसावे   आयुक्तांचा आदेश
Advertisement

                       आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे मंडईत थेट विक्रेत्यांशी संवाद साधले

Advertisement

सोलापूर - शहरातील वाहतुकीची कोंडी होतं असून आणि बाजारपेठेत शिरत आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज 'अॅक्शन मोड' मध्ये येत लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांमुळे होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी - सर्व विक्रेत्यांनी पालिकेने नेमून - दिलेल्या मंडई जागेवरच भाजी विक्री करावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी यावेळी दिला. आयुक्तांनी मंडईत प्रत्यक्ष जाऊन भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला.

यावेळी विक्रेत्यांनी प्रामुख्याने स्वच्छता, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधांबाबत आपल्या मागण्या मांडल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना त्वरित सुविधा पुरवा मंडईच्या आत भाजी विक्रेत्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन तिथे तातडीने सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतेवर भर मंडई परिसरात नियमित स्वच्छता राहील याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी. यावेळी पाहणी दौऱ्याप्रसंगी मंडई विभाग प्रमुख तपन डंके, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.