कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोस येथील अभंग गायन स्पर्धेत वीर राऊळ प्रथम

12:16 PM Sep 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

श्रीदेवी माऊली नवरात्र उत्सव मंडळ आरोस यांच्या वतीने आयोजित अभंग गायन स्पर्धेत लहान गटात वीर वामन राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटातून कौस्तुभ धुरी याने प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा 14 वर्षाखालील लहान गट व 14 वर्षावरील मोठा गट अशा दोन प्रकारात घेण्यात आली .लहान गटातून द्वितीय सर्वज्ञ वराडकर तृतीय केतन बिरजे तर उत्तेजनार्थ  बक्षीस कनक काळोजी याला देण्यात  आले. मोठया गटातून सुरज पार्सेकरने द्वितीय अन्वी धारगळकर हिने तृतीय क्रमांक पटकावला तर  अद्वैत पालवला  उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले या स्पर्धेसाठी निखिल नाईक, बाबा मेस्त्री ,संदेश देऊलकर महेश कुबल, दत्तगुरु दळवी, रितेश नाईक ,सिद्धेश कुबल ,विनायक नाईक ,रोशन नाईक, गणपत नाईक ,किरण कळंगुठकर, सुहास कोरगावकर ,नारायण चव्हाण यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली . स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील दशरथ नाईक यांनी केले. तबला साथ अक्षय कांबळी , हार्मोनियम साथ संजय घुबे यांनी दिली सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी बाबू गोडकर व उत्तम परब यांनी विशेष सहकार्य केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update#konkan update# marathi news #
Next Article