सौ. वेदिका परब ठरल्या पैठणीच्या मानकरी
कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ, वेंगुर्लेचे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहरातील कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्यावतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवानिमीत्त आयोजित केलेल्या रंग पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा... या स्पर्धेत सौ. वेदिका विजय परब या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर व्दीतीय क्रमांक सौ. संप्रिता परब व तृतीय क्रमांक सौ. मेघना राऊळ यांनी पटकाविला.वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळा मार्फत दरवर्षी विविध सांस्कृतिक व स्पर्धाचे आयोजन करते. यात महत्वाची असलेली स्पर्धा म्हणजे रंग पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा... ही होय. नवदुर्गा मातेच्या स्वरूपांत असलेल्या महिल्यांसाठी हि स्पर्धा खास करून घेण्यात येते या स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे सुत्रसंचालन राहुल कदम व अमित लाखे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.नवसाला पावणारी कँम्प काँर्नर मित्रमंडळाची नवदुर्गा माता कँम्प कॉर्नर मित्र मंडळाची श्री नवदुर्गा माता गेली 26 वर्षे मंगलमय वातावरणात, शांततेत व भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात पुजन होत आहे. नवसाला पावणारी अशी हि नवदुर्गा माता म्हणून अनेक जणांना प्रचिती आलेली आहे. या देवीच्या दर्शनाने पुजन करणाऱ्या सर्व भाविकांच्या इच्छाही पुर्णत्वास आलेल्या आहेत. हे त्यांनी केलेला नवस फेडताना दिसून आले आहे. या देवीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यत मंडळाचे सर्व सदस्य तसेच महिला या विविध स्वरुपाची कामे स्वतः पुढाकार घेऊन करतात. हेही एक वैशिष्ट्य आहे. देवीच्या प्रचितीमूळे दरवर्षी महिला व पुरुष भाविकांची संख्या वाढत आहे. हे भाग्य कँम्प काँर्नर मित्रमंडळास मिळत आहे. यापेक्षा यापुढे देवीचे दर्शनास शेकडो भाविक निश्चितच या ठिकाणी येतील. असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष उमेश येरम यांनी रंग पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.सदर स्पर्धेतील पैठणी विजेत्या वेदीका परब यांना महिला उद्योजक सौ उर्मिला उमेश येरम व सौ. आकांक्षा येरम यांनी, व्दीतीय क्रमांक विजेती सौ संप्रिमा परब यांना सौ. शिला सुशिल परब व सौ. विद्या गुणाजी परब यांनी तर तृतीय क्रमांक विजेती सौ. मेघना राऊळ या दोन क्रमांकांना येरम कँश्यू फँक्टरीतर्फे प्रणव व सौ. आकांक्षा येरम यांनी पुरस्कृत केलेल्या पैठणी या निलम निलेश वराडकर व रेश्मा परब यांनी वितरण केल्या. तसेच या स्पर्धेत उत्तेजनार्थ 8 क्रमांक पटकाविलेल्या सौ. रिया रमेश टेमकर, सौ. समिधा रेडकर, सौ. अनुजा माडये, सौ. रश्मी गावडे, सौ. सेजल गावडे, सौ. गोपिका राऊळ, सौ. संचिता वालावलकर यांना येरम कँम्प काँर्नर मंडळाकडून भेट वस्तू बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले.या बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांत प्रमुख पाहुणे मंडळाचे सल्लागार अँड. शाम गोडकर महिला उद्योजक सौ. उर्मिला येरम, वेंगुर्ले कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाचे अध्यक्ष उमेश येरम, उपाध्यक्ष राजू परब, खजिनदार सुशिल परब, तसेच देवीदास वालावलकर, आनंद शिरोडकर, श्याम वालावलकर, गुणाजी परब, मनिष रेवणकर यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.