For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांताचे विलगीकरण पुढील महिन्यात

06:12 AM Mar 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेदांताचे विलगीकरण पुढील महिन्यात
Advertisement

मुंबई :

Advertisement

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या मालकीच्या वेदांता लिमीटेड कंपनीचे विलगीकरण पुढील महिन्यात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहेत. ही कंपनी आता 5 कंपन्यांमध्ये स्वतंत्रपणे विभागली जाणार आहे.

37 अब्ज डॉलर मुल्याची असणारी नैसर्गिक स्त्राsतांची सदरची कंपनी एप्रिल महिन्यामध्ये विलगीकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे. या कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अगरवाल यांनी ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. अॅल्युमिनियम, झिंक, ऑईल व गॅस, पोलाद आणि उर्जा अशा पाचही उद्योगातील कंपन्या पुढील महिन्यामध्ये स्वतंत्रपणे विलगीकरणानंतर कार्यरत होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

विस्तारासाठी संधी

कर्जाचा भार कमी करण्यासाठी कंपनीने विलगीकरणाची योजना आखली आहे. विलगीकरणानंतर नव्या कंपन्यांना त्यांच्या अपेक्षित विस्तारासाठी योग्य ती संधी दिली जाणार असल्याचे चेअरमन अनिल अगरवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.