वेदांता ओडिशामध्ये 1 लाख कोटी गुंतवणार
कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची माहिती
नवी दिल्ली :
वेदांता समूह अॅल्युमिनियम रिफायनरी आणि स्मेल्टर प्रकल्प उभारण्यासाठी ओडिसा येथील रायगडा जिल्ह्यात जवळपास 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे, की या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा आगामी तीन वर्षांत सुरु होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जो कालावधी नंतर वाढविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
वेदांताने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या प्रकल्पाची घोषणा केली होती, की, कंपनी ओडिशामध्ये 60 लाख टन वार्षिक क्षमतेचा रिफायनरी आणि 30 लाख टन वार्षिक क्षमतेचा ग्रीन अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार यावर भाष्य करण्यात आले नव्हते.
मेक इन ओडिशा या राज्य व्यापार परिषदेच्या दरम्यान अग्रवाल म्हणाले, रायगडा जिल्ह्यात आमची 60 लाख टन वार्षिक क्षमतेची अॅल्युमिनियम रिफायनरी आहे आणि 30 लाख टन वार्षिक क्षमतेची अॅल्युमिनियम स्मेल्टर प्रकल्पाची उभारणी केली जाणार असल्याचेही नमूद केले आहे.