For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेदांताचे समभाग विभाजनानंतर बाजारात सुचीबद्ध

06:51 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
वेदांताचे समभाग विभाजनानंतर बाजारात सुचीबद्ध
Advertisement

वेदांता अॅल्युमिनीयमची दमदार एंट्री : 4 कंपन्या सुचीबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था मुंबई

वेदांत समूहाच्या विभाजनानंतर चार कंपन्या स्वतंत्र बनल्या असून समभाग सोमवारी भारतीय शेअरबाजारात सुचीबद्ध झाले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर यातील काही कंपन्यांचे समभाग विक्रीच्या दबावात आले व त्यांना लोअर सर्किटही लागले होते. दुसरीकडे विभाजनानंतर समूहाच्या बाजार भांडवल मूल्यात चांगली वाढ झालेली दिसून आली.

Advertisement

वेदांता अॅल्युमिनीयम कंपनीचा समभाग दमदारपणे सुचीबद्ध झाला. कंपनीचा समभाग बीएसईवर 527 रुपये व एनएसईवर 522 रुपयांवर सुचीबद्ध झाला. बाजारातील तज्ञांनी समभाग 400 रुपयांवर सुचीबद्ध होऊ शकतो, असा अंदाज लावला होता. पण सुरुवात चांगली झाली तरी नंतर विक्रीमुळे समभागावर दबाव राहिला. लोअर सर्किटसह समभाग 500 रुपयांवर आला. व्यवहारादरम्यान समभागाने 538 रुपये हा सर्वोच्च भाव गाठला होता.

आयर्न अँड स्टील व ऑईल अँड गॅसचे समभाग दबावात

याचदरम्यान वेदांता आयर्न अँड स्टीलचे समभाग बीएसईवर 22.25 रुपयांवर खुला झाला व नंतर 5.4 टक्के घसरत 21.05 रुपयांवर आला. व्यवहारादरम्यान 19.60 रुपयांपर्यंत समभाग खाली आला. वेदांता ऑईल अँड गॅसचा समभाग 39 रुपयांवर खुला झाल्यानंतर 40.95 रुपयांची उच्च्चांकी गाठली. पण 5 टक्के लोअर सर्किट लागून समभाग 37 रुपयांवर खाली आला.

 वेदांताची पॉवर

वेदांता पॉवरचा समभाग इतर कंपन्यांच्या तुलनेत जोरदार प्रदर्शनासह खुला झाला. 41.30 रुपयांवर खुला झालेला हा समभाग 43.35 रुपयांवर पोहचला. सकाळच्या सत्रात समभाग 4 टक्के वाढीसोबत 42.80 रुपयांवर होता.

संयुक्त भांडवल मूल्यात वाढ

वेदांतासमवेत सर्व  कंपन्यांचे संयुक्त बाजार भांडवल मूल्य जवळपास 3.55 लाख कोटी रुपये इतके झाले होते. विभाजनापूर्वी वेदांताचे बाजार भांडवल मूल्य 3.02 लाख कोटी इतके होते. कंपन्या वेगवेगळ्या केलेल्याचा फायदा समूहाला झाला असल्याचे स्पष्ट होते आहे.

Advertisement
Tags :

.