वेदान्ताला 3,400 कोटी उभारण्यास मंजुरी
एनसीडीच्या माध्यमातून रक्कम जमा करणार
नवी दिल्ली
खाण समूह वेदांत लिमिटेडच्या संचालक मंडळाने नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे 3,400 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. कंपनी खासगी प्लेसमेंटच्या आधारावर एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर सादर करणार आहे. कंपनीच्या झालेल्या बैठकीत संचालकांच्या अधिकृत समितीने 3,40,000 रूपये दर्शनी मूल्य सुरक्षित, अनरेट केलेले, अनलिस्टेड, रिडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर खासगी प्लेसमेंटच्या आधारावर सादर केले आहे, असे वेदांत लिमिटेडने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. वेदांत समूहाची प्रमुख कंपनी वेदांत रिसोर्सेस लिमिटेडने गेल्या आठवड्यात जाहीर केले की कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना 1.25 अब्ज डॉलर निधी मिळवण्यात यश आले आहे. कंपनीने म्हटले आहे की हा निधी दीर्घकालीन भांडवली संरचना तयार करण्यास सहाय्यक ठरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.