For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vedant Bandgar Murder सांगलीतील हादरवणाऱ्या वेदांत हत्याकांडात आणखी एकाला बेड्या

04:11 PM Jun 19, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
vedant bandgar murder सांगलीतील हादरवणाऱ्या वेदांत हत्याकांडात आणखी एकाला बेड्या
Advertisement

| त. भा. प्रतिनिधी सांगली : वेदांत बंडगर हत्याकांडात आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरूच असून, मुख्य सूत्रधार नीलेश गडदेच्या आणखी एका जोडीदाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली आहे.

Advertisement

संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे (वय २३, रा. ढालगाव) याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यातील एका अल्पवयीन साथीदारालाही पकडून सुधारगृहात पाठविले.

दरम्यान, वेदांतच्या हत्येचा मुख्य सूत्रधार नीलेश बिठोबा गडदे याची पोलिस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविली आहे. त्याचे फरार साथीदार किरण लोखंडे आणि विशाल चौगुले यांचा कसून शोध सुरू आहे. तर अतुल वायदंडे याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, सागर चौगुले उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे.

Advertisement

रेल्वे मालधक्का कामावरून खरात आणि गडदे गटात दीर्घकाळ वाद सुरू होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे असल्याने ते सोडवण्यासाठी गडदे दबाव टाकत होता.

विशाल चौगुलेने पुरवली गावठी पिस्तुले?

कोठडीत नीलेश गडदेची चौकशी सुरू असताना दोन गावठी पिस्तुले जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे फरार आरोपी विशाल चौगुले याने पुरवल्याची माहिती समोर आली आहे. एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरत असून, फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

Advertisement
Tags :

.