महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

15 ऑगस्टला झळकणार ‘वेदा’

06:55 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जॉन अब्राहम, शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत

Advertisement

चालू महिन्यात जॉन अब्राहम याचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट वेदा प्रदर्शित होणार आहे. चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशा स्थितीत निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. यात अभिनेत्याचा जबरदस्त अॅक्शन दिसून येतो.

Advertisement

निखिल अडवाणीकडून दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील दिसून येणार आहे. जब-जब अधर्म बढेगा, मैं धर्म की रक्षा करुंगा’ असा संवाद याच्या ट्रेलरमध्ये दिसून येतो. तर दुसरीकडे शर्वरी वाघ या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येत आहे. स्वत:च्या अधिकारांसाठी लढणाऱ्या महिलेची भूमिका ती साकारत आहे.

जॉन अब्राहम आणि शर्वरी यांच्या या चित्रपटात तमन्ना भाटिया, अभिषेक बॅनर्जी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट झी स्टुडिओज, एम्मे एंटरटेन्मेंट आणि जेए एंटरटेन्मेंटकडून निर्माण करण्यात आला आहे. अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आगामी 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article