Vat Purnima 2025: भावनेशी पर्यावरणाची गुंफण करणारा सण, श्रद्धेची गाठ बांधणारी वटपौर्णिमा..
वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अतिशय मोठे आहे
By : गजानन लव्हटे
सांगरुळ : वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे, विशेषत: विवाहित स्त्रियांच्या जीवनात. याच दिवशी, त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्याप्रती प्रेम करण्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जला व्रत करतात. वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर ती एक नात्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणारी आणि त्यांच्या घट्ट वीणीत श्रद्धेची गाठ बांधणारी दिव्य परंपरा आहे.
शिवाय पर्यावरणाचा संदेशही वटपौर्णिमा देते आहे. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अतिशय मोठे आहे. विवाहाच्या वेळी घेतलेले सप्तपदीचे वचन आणि पती-पत्नीमधील सात जन्मांचे बंध या सणात प्रकर्षाने अधोरेखित होतात. सावित्रीने दृढ निश्चयाने आणि भक्तीने आपल्या मयत झालेल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत आणले. ही कथा आजही विवाहित स्त्रियांना प्रेरणा देते आहे. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील सुवासिनी या दिवशी वटवृक्षाला केवळ झाड म्हणून नव्हे, तर एक पवित्र प्रतिक म्हणून पूजत असतात.
याच पूजनाला जीवन, सृष्टी आणि संरक्षण यांचे प्रतिक मानले जाते. पत्नीच्या भक्तीचे आणि पर्यावरण संवर्धनाचे प्रतिक वटपौर्णिमा ही पत्नीच्या भक्ती आणि शक्तीचे प्रतिक आहे. सावित्रीने पतीच्या प्राणांसाठी केलेले व्रत तिच्या भक्तीचे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.
वटपौर्णिमा कशी साजरी करतात वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे, घरातील देवांची पूजा करून व्रताचा संकल्प घ्यावा. वडाची पूजा करण्यासाठी लाखो स्त्रिया आवश्यक ते सर्व साहित्य आदल्यादिवशीच आपल्या घरी तयार ठेवत असतात. या साहित्यात प्रामुख्याने धूप, दीप, अगरबत्ती, हार-फुले, पाच प्रकारची फळे (मुख्यत: आंबा), वडाच्या झाडाभोवती बांधण्यासाठीचा धागा असे वस्तूंचा समावेश असतो.
अनेक सुवासिनी भरजरी साडी, बांगड्या, मनीमंगळसूत्र, टिकली, कुंकू, गजरा आणि पायात पैंजण अशा साजशृंगाराने नटून-थटून वडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर पडतात. अनेक जणी तर पारंपरिक वेशभूषा कऊन तर अनेकजण आपल्या विवाहात घेतलेली साडी नेसून वडाची पूजा करण्यात समाधान मानत असतात. पूजेनंतर वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून धागा गुंफतात. हा धागा गुंफताना आपल्या पतीचे स्मरण करत जन्मोजन्मी हाच पती लाभू अशी प्रार्थनाही करतात.
याचवेळी अनेक जाणकारांकडून सुवासिनींना सावित्री-सत्यवानाची कथा ऐकवली जाते. व्रताच्या निमित्ताने काही स्त्रिया निर्जल उपवास करतात. वडाची पूजा झाल्यानंतरच व्रत सोडतात. काहीजणी तर सूर्यास्तानंतरच व्रत सोडून यमासह देवदेवतांकडे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या घरोघरी सुखसमृद्धी नांदू दे, अशी मनोकामनाही देवाकडे करत असतात.
असे मानले जाते की, वटपौर्णिमेच्या यादिवशी सावित्रीप्रमाणे व्रत पाळणाऱ्या स्त्रियांना पती पुढील सात जन्मांसाठी प्राप्त होतो. आधुनिक युगातही वटपौर्णिमा मोठ्या भक्ती भावाने होते. आधुनिक युगातही वटपौर्णिमा या सणाला तितक्याच भक्तीभावाने साजरे केले जाते आहे. अनेक स्त्रिया या दिवशी नात्यांचा उत्सव साजरा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या एकतेसाठीसुद्धा प्रार्थना करत असतात.
बदललेल्या काळानुसार सोशल मीडियावरही याच दिवशी विवाहित स्त्रियांचे फोटो आणि श्रद्धेचा आविष्कार बघायला मिळतो आहे. वटपौर्णिमा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नव्हे, तर ती नात्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देणारी दिव्य परंपरा आहे. वनस्पती आणि पर्यावरणाचे संरक्षण वडाचे झाड हे पर्यावरणासाठी खूप महत्त्वाचे आहे. वटपौर्णिमेच्या पूजेच्यानिमित्ताने सर्व सुवासिनी वडाच्या झाडाला फेरे मारतात. पर्यावरणप्रेमी तर झाडाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जनमाणसांना सातत्याने साद घालत असतात.
वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त
वटपौर्णिमा-2025 मध्ये मंगळवार, 10 जून रोजी आहे. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथीचा आरंभ 10 जून रोजी सकाळी 11.35 वाजता होणार असून ती 11 जून दुपारी 1.13 वाजेपर्यंत राहील. या दिवशी वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 11.55 ते दुपारी 12.51 दरम्यानचा आहे. त्याशिवाय ब्रह्म मुहूर्तात सुरू होणारी पूजा अधिक फलदायी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय सूर्योदयापासून दुपारपर्यंतची वेळही पूजेसाठी योग्य असल्याचे जाणकार सांगत आहेत.