For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-रेक्स डायनासोरपेक्षा मोठा होता ‘वासुकी नाग’

06:22 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी रेक्स डायनासोरपेक्षा मोठा होता ‘वासुकी नाग’
Advertisement

गुजरातच्या कच्छमध्ये सापडले जीवाश्म : वैज्ञानिकांनी केले शिक्कामोर्तब

Advertisement

वृत्तसंस्था/ कच्छ

गुजरातच्या कच्छमध्ये अत्यंत प्राचीन जीवाश्म मिळाले आहेत. हे जीवाश्म वासुकी नागाचे असल्याचे बोलले जात आहे. हा जगातील सर्वात मोठा नाक होता. याहून मोठा अॅनाकोंडा देखील नाही. तसेच डायनोसॉरांच्या काळातील टी रेक्स डायनासोरपेक्षाही हा नाग मोठा होता. वासुकी नागाचे जीवाश्म कच्छया पानंधरो लाइटनाइट खाणीत मिळाले आहेत.

Advertisement

समुद्रमंथनासाठी वासुकी नागाचा मदत घेण्यात आली होती. पौराणिक कथेनुसार वासुकी नागाला दोरीच्या स्वरुपात मेरू पर्वताभोवती गुंडाळून मंथन करण्यात आले होते. या समुद्रमंथनातून अमृत आणि विष यासारखे अनेक महत्त्वाच्या गोष्टी बाहेर निघाल्या होत्या. वैज्ञानिकांनी संबंधित खाणीतून वासुकी नागाच्या कण्याच हाडाचे 27 हिस्से हस्तगत केले आहेत. याचे वैज्ञानिक नाव वासुकी इंडिकस आहे.

याची आकृती विशालकाय होती. परंतु हा नाग विषारी राहिला नसावा असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सायंटिफिक रिपोर्ट्स या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार आयआयटी रुडकीचे पॅलेंटियोलॉजिस्ट देवजीत दत्ता यांनी याचा आकार पाहून हा वासुकी नाग होता असे समजते, मंदगतीने सरपटणारा धोकादायक शिकारी असे याचे स्वरुप राहिले असावे असे म्हटले आहे.

36-49 फूट लांबी

हा अॅनाकोंडा आणि अजगराप्रमाणे स्वत:च्या शिकारीला दाबून ठार करत असावा. परंतु जागतिक स्तरावर तापमान वाढू लागल्यावर याची संख्या कमी होऊ लागली. याची सरासरी लांबी 36 ते 49 फूट लांब राहिली असावी. तसेच याचे वजन सुमारे 1 हजार किलोग्रॅम इतके होते असे देवजीत यांनी सांगितले आहे.

भगवान शिवचा नागराज

वासुकी नागाला भगवान शिवचा नाग म्हटले जाते. तसेच याला सर्पांचा राजा देखील म्हणण्यात येते. हा प्रागैतिहासिक सर्प तितानोबोवाचा विरोधी मानला जातो. तितानाथेबोआचे जीवाश्मांचा शोध कोलंबियाच्या एका कोळसा खाणीत 2009 साली लागला होता. तो सुमारे 42 फूट लांब होता. तर त्याचे वजन 1100 किलोग्रॅम इतके होते. हा सर्प 5.80-6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळून यायचा असे नमूद करण्यात आले.

विस्तृत अध्ययन सुरू

वासुकीच्या आकाराची तुलना तितानोबोओशी केली जाऊ शकते. परंतु दोघांच्या कण्याच्या हाडांमध्ये फरक होता. वासुकी आकाराने तितानोबोआपेक्षा मोठा होता की नाही हे आताच सांगणे अवघड असल्याचे उद्गार आयआयटी रुडकीचे प्राध्यापक अन् पथकाचे सदस्य सुनील वाजपेयी यांनी काढले आहेत. हा नाग सेनोजोइक काळात अस्तित्वात होता. म्हणजेच सुमारे 6.60 कोटी वर्षांपूर्वी हा सर्प पृथ्वीवर होता. तेव्हा डायनासॉर युगाचा अंत झाला होता. वासुकी नागाच्या हाडांचा जो सर्वात मोठा हिस्सा मिळाला आहे तो साडेचार इंच रुंद आहे. यातून वासुकी नागाचे शरीर कमीतकमी 17 इंच रुंद होते हे कळते. याच्या उर्वरित हिस्स्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

परिसरात अन्य अवशेष

वासुकी नागाच्या आहाराविषयी वैज्ञानिकांना ठोस माहिती मिळविता आलेली नाही. परंतु याचा आकार पाहता तो त्या काळातील विशालकाय मगरींना फस्त करत असावा असे मानले जात आहे. आसपास अनेक मगरी आणि कासवांचे जीवाश्म मिळाले आहेत. तसेच दोन प्रागैतिहासिक व्हेल माशांचे जीवाश्म देखील मिळाले आहेत. वासुकी मॅडसाईडेई फॅमिलीच्या सर्पांशी संबंधित होता. हा सर्प 9 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर होता आणि 12 हजार वर्षांपूर्वी त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले.

Advertisement
Tags :

.