महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नसरल्लाच्या बंकरमध्ये प्रचंड संपत्ती

06:34 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलचे प्रतिपादन, 50 कोटी डॉलर्सचे घबाड

Advertisement

► वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा ठार झालेल्या म्होरक्या हसन नसरल्ला याच्या बंकरमध्ये 50 कोटी डॉलर्सहून अधिक किमतीचे सोने आणि रोख रक्कम अशी संपत्ती आहे, असे प्रतिपादन इस्रायलच्या सेनेने केले आहे. नसरल्ला या बंकरमध्ये वास्तव्यास होता, तेव्हा त्याने ही संपत्ती येथे आणून ठेवलेली होती, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इस्रायली सेनेचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनिअर हॅगारी यांनी ही माहिती मंगळवारी पत्रकारांना दिली आहे.

हा बंकर लेबनॉनची राजधानी बैरुट येथील एका रुग्णालयाच्या खाली बांधण्यात आला आहे. रुग्णालयावर सहसा हल्ला केला जात नाही. त्यामुळे बंकर सुरक्षित राहील, अशा समजुतीने तो रुग्णालयाच्या खाली बांधण्यात आल्याचे दिसून येते. सध्या या बंकरवर हल्ला करण्याचा इस्रायलचा विचार नाही, असेही हॅगारी यांनी स्पष्ट केले आहे. या रुग्णालयाचा उपयोगही हिजबुल्लाकडून आपल्या दहशतवादी कारवाया लपविण्यासाठी केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

हिजबुल्लावर कारवाई करा

हिजबुल्ला या दहशतवादी संघटेनवर लेबनॉन सरकारने कारवाई करावी, अशी सूचना इस्रायलने केली आहे. या संघटनेचे नेते धर्माच्या नावाखाली प्रचंड संपत्ती संकलित करीत आहेत, हे या बंकरमध्ये सापडलेल्या संपत्तीच्या प्रचंड साठ्याने सिद्ध केले आहे. हिजबुल्लाला हा पैसा उपयोगात आणण्याची संधी लेबनॉन सरकारने देऊ नये, असे आवाहनही इस्रायलने त्या देशाच्या प्रशासनाला केले आहे.

संघर्ष सुरुच

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये इस्रायलने हिजबुल्लाच्या अनेक स्थानांवर वायुहल्ले केले असून या संघटनेचे शस्त्रसाठे नष्ट केले आहेत. सोमवारी लेबनॉनमधील काही बँकांवरही इस्रालयने हल्ला करुन त्या उद्ध्वस्त केल्या होत्या. याच बँकांमधून हिजबुल्लाला पैशाचा पुरवठा केला जातो, असे इस्रायलच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे.

Advertisement
Next Article