कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Chiplun Vashishti River : गाळ उपसाप्रश्नी ठाकरे शिवसेना आक्रमक, अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

11:19 AM May 09, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

जलसंपदा कार्यालयावर धडक; अधिकाऱ्यांना विचारला जाब

Advertisement

चिपळूण : चिपळूण वाशिष्ठीसह शिवनदीत काढण्यात येत असलेला गाळ बोगस पद्धतीने काढला जात असल्याचा आरोप करत या प्रश्नावर गुरुवारी ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जलसंपदा विभागावर धडक दिली. यावेळी गाळ उपशासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना धारेवार धरत याविषयी संताप व्यक्त केला. येत्या ८ दिवसातील गाळ उपशाचा लेखी आढावा द्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

Advertisement

२०२१ मध्ये चिपळूण शहरासह परिसरात आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठीसह शिवनदीतील गाळ प्रश्न प्रखरतेने पुढे आला होता. समस्त चिपळूणवासियांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने राज्यभरातील यंत्रसामुग्री येथे लावून वाशिष्ठीतील गाळ उपसा सुरू केला.  सुरुवातीच्या गाळ उपशानंतर गाळ उपशाची गती थंडावली. शिवाय यंत्रसामुग्रीही अन्य जिल्ह्यात गेल्याने गेल्या साडेचार वर्षात पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा पूर्णपणे निघालेला नाही.

असे असताना या गाळ प्रश्नावर काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांना आढावा घेताना अधिकाधिक गाळ काढण्यावर भर द्या, त्यासाठी डंपर भाडेतत्वावर घेऊन गाळमुक्त नद्या करण्याच्या सूचना जलसंपदा व पाटबंधारे विभागाला त्यांनी दिल्या होत्या. सद्यस्थितीत शिवनदीत गाळ उपशाचे काम सुरू असताना हा गाळ न उचलता तो तेथेच नदीकिनारी ठेवला जात आहे.

शिवाय यंत्रणेकडून गाळ काढण्याच्या कामापेक्षा दिवसभर निव्वळ वेळकाढूपणा अधिक असून गाळ डंपरमध्ये जेमतेम भरुन नेला जात असल्याचा आरोप करत गुरुवारी ठाकरे शिवसेनेने जलसंपदा विभागावर धडक दिली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत यावर कोणाचेही नियंत्रण नसून तुमच्याच आशीर्वादाने हा प्रकार चालत असल्याने त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवाय आतापर्यंत गाळ काढण्याची इतकी मोठी आकडेवारी देत असताना अधिकाऱ्यांनी त्याचे नेमक्या कशा पद्धतीने मोजमाप केले, ऑपरेटर जी आकडेवारी देतो, त्यानुसार तुम्ही वाढीव स्वरुपातील बोगस आकडेवारी जनतेसमोर आणता, वाशिष्ठीसह शिवनदी गाळमुक्त होण्यासाठीच्या निधीचा गैरवापर करता, असे आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

यामुळे येत्या ८ दिवसातील गाळ उपसा कसा काढला, तो कुठे टाकला आणि किती काढला याचा लेखी आढावा द्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवू अशा इशाराही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.  यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, उपशहरप्रमुख भैया कदम, संतोष पवार, युवा सेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळ्ये, संजय गोताड, संदेश किंजळकर, मनोज पांचाळ, सचिन चोगले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :
@ratnagiri#chiplun news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#uday samantratnagiri newsShiv Sena
Next Article