लोकमान्य सोसायटीचेतर्फे गोव्यात ‘वरवरचे वधू-वर’ नाटक ; 9 व 10 ऑक्टोबरला विशेष प्रयोग
पणजी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टि-स्टेट) यांच्या वतीने प्रसिद्ध मराठी नाटक ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचे गोव्यात दोन विशेष प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
या नाटकाचा पहिला प्रयोग शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता हनुमान नाट्यगृह, म्हापसा येथे होणार आहे. तर दुसरा प्रयोग शनिवार, 10 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता रवींद्र भवन, मडगाव येथे रंगणार आहे.
विराजस कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित हे हलकेफुलके कौटुंबिक नाटक असून, लोकप्रिय कलाकार सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सुरज पारसनीस प्रमुख भूमिकेत रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. विनोद, कौटुंबिक नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांची मनोरंजक गुंफण या नाटकातून पाहायला मिळणार आहे.
नाटकाच्या प्रवेशिका संबंधित नाट्यगृह तसेच लोकमान्य सोसायटीच्या स्थानिक शाखांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ‘बुक माय शो’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही प्रवेशिका बुक करता येणार आहेत.
गोव्यातील नाट्यरसिकांसाठी हा विशेष सांस्कृतिक सोहळा ठरणार असून, कला आणि सामाजिक भान यांचा सुरेख संगम असलेल्या या नाटकाचा मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 917026647381 आणि 916366934516 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.