‘बॉर्डर 2’मधील वरुणचा फर्स्ट लुक समोर
‘बॉर्डर 2’ चित्रपटातील वरुण धवनचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे. हा फर्स्ट लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटातील सनी देओलचा फर्स्ट लुक शेअर केला होता. हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘देशाचा शिपाई पीव्हीसी होशियार सिंह दहिया’ अशी पॅप्शन वरुण धवनने चित्रपटातील स्वत:चा लुक शेअर करत दिली आहे. या पोस्टरमध्ये वरुण हा सैन्याच्या गणवेशात असून त्याच्या हातात बंदुक आहे. आसपास इतर शिपाई असून ज्यातील काही जखमी आहेत, तर काही युद्ध लढत आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मेधा राणा, मोना सिंह, सोनम बाजवा हे कलाकार दिसून येणार आहेत. तर दिग्दर्शन अनुराग सिंह यांनी केले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बॉर्डर’ चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता, चित्रपट 1971 च्या युद्धातील ‘बॅटल
ऑफ लोंगेवाला’वर आधारित होता. त्या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सर, सुदेश बेरी आणि कुलभूषण खरबंदा हे कलाकार होते. तब्बू, पूजा भट्ट, राखी गुलझार, शरबनी मुखर्जी आणि सपना बेदी या अभिनेत्रीही दिसून आल्या होत्या.