For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायआरएफच्या चित्रपटात वरुण धवन

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
वायआरएफच्या चित्रपटात वरुण धवन
Advertisement

बॉलिवूडमध्ये सध्या भयपटांची चलती अधिक आहे, अनेक भयपट प्रदर्शित होत असून प्रेक्षकांची पसंतीही त्यांना मिळत आहे. आता ‘भेडिया’मध्ये काम केल्यावर वरुण धवन पहिल्यांदाच एखाद्या हॉरर चित्रपटात काम करणार आहे. वरुणने आतापर्यंत प्रामुख्याने कॉमेडी अन् रोमान्सची धाटणी असलेल चित्रपट केले आहेत. परंतु बदलापूर, ऑक्टोबर, सुई धागा अन् भेडिया अशाप्रकारचे चित्रपटही त्याच्या वाट्याला आले आहेत. वरुण आता यशराज फिल्म्ससोबत काम करणार आहे. वायआरएफ देखील पहिल्यांदाच भयपटाच्या निर्मितीत पाऊल ठेवत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार आहे. यापूर्वी त्याने रॉकेट बॉयज ही सीरिज सादर केली होती. अभय पन्नू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबत याची पटकथाही लिहित आहे. वरुणच्या या भयपटाच्या कहाणीचे स्वरुप अद्याप समोर आलेले नाही, परंतु याचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरीस होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. वरुणच्या या चित्रपटातील नायिकेचे नाव अद्याप उघड झालेले नाही. परंतु एखाद्या नव्या अभिनेत्रीसोबत त्याची जोडी जमणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.