कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांदा लकरकोट दत्त मंदिर पुर्नप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

02:59 PM May 02, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

५ मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; ८ मे रोजी पंडीत अजित कडकडे यांचा गायन कार्यक्रम

Advertisement

प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरातील एकमेव असलेल्या तसेच समस्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लकरकोट येथील श्री दत्तमंदिराच्या नुतनीकरणाचे काम सर्वांच्या श्रद्धात्मक सहकार्यातून पूर्ण झाले आहे. या मंदिराचा पुर्नप्रतिष्ठापना व कलशा रोहण सोहळा सोमवार दि ५ मे ते गुरुवार दि. ८ मे २०२५ या कालावधित श्री देव बांदेश्वर भुमिका पंचायतन मर्याददार, सिमधडे, यजमान, बाम्हणवृंद व समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यानिमित्त सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवारी पंडीत अजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ठिक ४.०० वा. श्री दत्त महाराजांच्या मुर्तीची सवाद्य बांदा शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार दि. ६ मे रोजी सकाळी ठिक ८.०० वा. प्रायश्चितपुर्वक देहशुध्दी, देवांना निमंत्रण ,गाऱ्हाणे, पुण्याहवाचन, नांदीश्राध्द, आचार्य ऋत्विक वरण, प्राकारशुध्दी ,वास्तुमंडल, ब्रम्हादीमंडल, नवग्रहमंडल, स्थापना पूजन, जलधिवास आदी धार्मिक विधी होतील. सायंकाळी ठिक ५.०० वा. श्री स्वामी समर्थ मठ, डोंगरपाल-डिंगणे यांचा भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर अन्य स्थानिक भजने होतील. बुधवार दिनांक ७ मे रोजी सकाळी ठिक ८.०० वा. स्थापितदेवता पूजन अग्निस्थापना, नवग्रहहोम, वास्तूहोम, ब्रम्हादीमंडल होम, वास्तू स्थापना, मुख्यदेवता हवन होईल. त्यानंतर सकाळी ठिक ११.३० वा. कलशारोहण होईल. सायंकाळी ठिक ५.०० वा. श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन सेवा मंडळ, बांदा यांची भजनसेवा व त्यानंतर अन्य स्थानिक भजने होतील. सायंकाळी ठिक ७.०० वा. नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ, मळगांव - सावंतवाडी यांचा "अलख निरंजन अर्थात दत्त महिमा " हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होईल. गुरुवार दि. ८ मे २०२५ रोजी सकाळी ठिक ८.०० वा. स्थापितदेवता पूजन, सकाळी ठिक १० वा. २२ मि. मूर्तीस्थापना, तत्वहोम प्राण प्रतिष्ठा पूर्वक महापूजा, बलीदान, पूर्णाहूती, अभिषेक, गाऱ्हाणे, आशिर्वाद, ब्राम्हण पूजन, दक्षिणा सत्कार आदी कार्यक्रम होतील. दुपारी ठिक १.०० वा. महाआरती तर दुपारी ठिक १.३० वा. महाप्रसाद आरंभ होईल. सायं. ठिक ५.०० वा. बुवा तात्या स्वार व सहकारी, डेगवे यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ठिक ८.०० वा. प्रसिध्द गायक पंडित अजित कडकडे यांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम होईल.संगीत साथ तबला- रुपक वझे, मुंबई हार्मोनियम - कॅप्टन प्रकाशचंद्र वगळ, मुंबई,पखवाज -दिनूअण्णा भगत,मुंबई, मंजिरी - महावळी , स्वरसाथ किशोर देसाई, मुंबई करणार आहेत. सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थित राहून या संपूर्ण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तप्रसाद कला क्रिडा मंडळ लकरकोट बांदाच्या वतीने अध्यक्ष सुशांत पांगम आणि उपाध्यक्ष शुभम साळगांवकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# banda # tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # news update
Next Article