For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातोंड देवी सातेरी , रवळनाथ मंदिराचा शिखर कलश प्रतिष्ठापना व महारुद्रानुष्ठान

06:34 PM May 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मातोंड देवी सातेरी   रवळनाथ मंदिराचा शिखर कलश प्रतिष्ठापना व महारुद्रानुष्ठान
Advertisement

१२ मे पासून विविध धार्मिक कार्यक्रम

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मातोंड येथील श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थान व श्री देव रवळनाथ मंदिराचा सोमवार १२ मे पासून शिखर कलश प्रतिष्ठापना व महारुद्रानुष्ठान वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार १२ मे रोजी सकाळी ८ वाजता गणपती पूजन,देवता प्रार्थना,पुण्याहवाचनादि,आचार्यवरण,स्थलप्रकार,शुद्धी,श्री देव रवळनाथ महारुद्रारंभ,प्रधान देवता स्थापन,शिखर कलशाला अष्टकलशाभिषेक,ग्रहहोम ,शिखर कलश प्रतिष्ठांगतभूत हवन,नैवेद्य , दुपारी १२ वाजता आरती,दुपारी १.३० वाजता तीर्थप्रसाद,सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने,मंगळवार १३ मे रोजी सकाळी ८ वाजता आवाहित देवता पूजन,महारुद्र अंगभूत जप,महारुद्र अनुष्ठान,अंगभूत होम,सकाळी ११.७ मिनिटांनी शुभमुहुर्तावर शिखर कलश प्रतिष्ठापना,क्षेत्रपाल बलिदान,पुर्णाहुती अभिषेक,नैवेद्य,दुपारी १ वाजता आरती,देवता प्रार्थना,आशिर्वाद ग्रहण,दुपारी २ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद,सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजता स्थानिकांची भजने गुरुवार १५ मे रोजी सकाळी ८ वाजता श्री देव सातेरीकडे लघुरुद्र व सत्यनारायण महापूजा,दुपारी १२ वाजता आरती,नैवेद्य,तीर्थप्रसाद,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन गावकर मंडळी व स्थानिक सल्लागार उपसमिती मातोंड यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.