तळवडेत ६ ते ८ जानेवारीपर्यंत नववर्ष स्वागतानिमित्त विविध कार्यक्रम
न्हावेली / वार्ताहर
श्री देव दाळकर म्हाळाईदेवी मित्रमंडळ ग्रामस्थ आयोजित श्री म्हाळाईदेवी विद्यामंदिर शाळा तळवडे नं.९ येथे ६ ते ८ जानेवारी रोजी नववर्ष २०२५ स्वागतनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ६ रोजी रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ,लोरे कणकवली बुवा - रिया मेस्री ( पखवाज - मिलिंद लाड तबला- संकेत पवार ) विरुद्ध श्री देव मालोबा महिला भजन मंडळ,पाळेकरवाडी बुवा - भारती पाळेकर ( पखवाज - बाळा पाळेकर ) मंगळवार ७ रोजी सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा रात्री ८ वाजता “ वेडा चंदन “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.बुधवार ८ रोजी भाई कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा “ विष्ठाअग्नि शततारका नक्षत्र “ हा नाट्यप्रयोग होणार आहे लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.