निरवडे आरोस तिठा येथे १९ रोजी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
न्हावेली / वार्ताहर
महापुरुष कला क्रिडा सेवा मंडळ, निरवडे माळकरवाडी आयोजित निरवडे आरोस तिठा येथे १९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार १९ रोजी सकाळी ९.३० वाजता शिवप्रतिमापूजन,सकाळी १० वाजता शिवचरित्रावर व्याख्याते प्रसन्न सोनुर्लेकर मळगाव यांचे व्याख्यान,रात्री ८ वाजता गौतमेश्वर दशावतार नाट्यमंडळ,दाभोली यांचा “ कृती विकृती “ हा नाट्यप्रयोग गुरुवार २० रोजी महापुरुष उद्योग समूह श्री हरि वारंग सिद्धेश वारंग स्वप्नील वारंग पुरस्कृत रात्री ८.३० वाजता जिल्हास्तरीय खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा प्रथम पारितोषिक ७,७७७ आकर्षक चषक व प्रशस्तिपत्रक, द्वितीय पारितोषिक ५,५५५ आकर्षक चषक व प्रशस्तिपत्रक,तृतीय पारितोषिक ३,३३३ आकर्षक चषक व प्रशस्तिपत्रक अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी हरि वारंग ९४२३८३ ३६२६ याच्यांशी संपर्क साधावा.लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.