मसुरेत हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
मसुरे प्रतिनिधी
मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळा शुक्रवार दिनांक 11 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. यावेळी जय बजरंग बली नाट्य मंडळाच्या भव्य रंग मंचावर सांस्कृतिक सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून भक्तीमय आणि उत्साह पूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता लघु रुद्र व अभिषेक, सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, रात्री 10.30 वाजता जय बजरंग बली नाट्य मंडळाचा "स्वराज्याचा नंदादीप" हा ऐतिहासिक नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता कीर्तन व हनुमान जन्मोत्सव, सकाळी साडे सहा वाजता पालखी सोहळा, सकाळी 11 वाजता नेत्रचिकित्सा आणि आरोग्य तपासणी शिबिर, दुपारी एक वाजता महाप्रसाद, रात्री साडे सात वाजता जय बजरंग बली प्रसादिक भजन मंडळाचे सुश्रव्य भजन, रात्री साडेआठ वाजता कावावाडीतील दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, तसेच कावावाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा ,रात्री साडेदहा वाजता दत्त माऊली पारंपरिक दशावता नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतार नाट्य प्रयोग. रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रात्री दहा वाजता कावा वाडीतील महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, 14 एप्रिल रात्री साडेआठ वाजता जय बजरंग बली प्रसादिक भजन मंडळाचे महा ट्रीक्स सीन युक्त दिंडी नृत्य, रात्री दहा वाजता स्नेहभोजन .सर्व कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन भंडारी समाजसेवा संघ मसुरे कावावाडी यांनी केले आहे.