महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नववंशी ठाकर समाज कोनाळकट्टातर्फे दीपोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

03:18 PM Nov 16, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

Advertisement

दीपोत्सव समिती व नवतरुण मंडळ, नववंशी ठाकर समाज कला क्रीडा मंडळ कोनाळकट्टा यांनी दीपोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांचा मुंबादेवी महिमा हा नाट्य प्रयोग, शनिवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता भव्य मासे पकडण्याची स्पर्धा, रात्री ८:३० वाजता खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा व रविवार २० नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ओंकार कला मंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार नाट्य, हास्य, नृत्य, विनोदाचा सदाबहार कार्यक्रम, गणेश जन्म देखावा, छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यु व ज्योतिबा सप्तशृंगी दर्शन‌ या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मासे पकडण्याच्या व खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी विष्णू ठाकुर, सिद्धेश पांडुरंग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# traun bharat news# dodamarg# diwali
Next Article