महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोंदा येथे 'दिपावली शो टाईम' निमित्त विविध कार्यक्रम

04:09 PM Nov 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

१३ पासून कार्यक्रमांना सुरुवात

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
आरोंदा खासकीलवाडा मित्रमंडळातर्फे दिपावली शो टाईम २०२३ निमित्त कार्यक्रमांचे आयोजन सोमवार १३ नोव्हेंबरपासून करण्यात आले आहे.सोमवार १३ रोजी सायंकाळी ५ वाजता खास महिलांसाठी आरोंदा मर्यादित निवेदक व मालवणी समालोचक बादल चौधरी सोबत खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता लहान गट व मोठ्या गटात गोवा व सिंधुदुर्ग मर्यादित खुली रेकॅार्ड डान्स स्पर्धा होणार आहे लहान गटासाठी - प्रथम पारितोषिक ३००० रुपये,द्वितीय २००० रुपये,तृतीय १००० रुपये तसेच उत्तेजनार्थ तीन पारितोषिके , पंधरा वर्षावरील मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक ५००० रुपये,द्वितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये उत्तेजनार्थ तीन पारितोषिके देण्यात येणार आहे. मंगळवार १४ रोजी रात्री १० वाजता कोल्हापूर निर्मित ‘ सप्तसुर ‘ डान्स म्युझिक नाईट शो होणार आहे .रेकॅार्ड डान्स स्पर्धेत भाग घेण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी शुभम - ७८७५८३६४०४ व योगेश यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# diwali show time # aaronda # tarun bharat news#
Next Article