कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीराम प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर पेंडूर गावात 22 रोजी विविध कार्यक्रम

04:58 PM Jan 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कट्टा / वार्ताहर
प्रभू श्री रामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार 22 रोजी होणार आहे. हा सोहळा ना भूतो न भविष्यती असा जगाला हेवा वाटावा असा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. हा दिवस संपूर्ण देशभरात सण म्हणून साजरा केला जाणार आहे. याचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील पेंडूर गावात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8.00 वाजता ऐतिहासिक डोंगरावर असलेल्या हनुमान मंदिरात विधिवत पूजा करत हनुमान चालीसा पठण करत कार्यक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. नंतर 9.00 वाजता सातेरी मंदिर येथून पेंडूर नाका येथे गणेश मंदिर मध्ये पूजा करून पुढे वेताळ मंदिर पर्यंत वेशभूषा करत प्रभु श्री रामाची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ठीक 11.00 वा श्री देव वेताळ मंदिर येथे विधिवत ग्रामदेवतेची पूजा करून श्री रामाच्या मूर्तीला अभिषेक करून पूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गावात होणाऱ्या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
tarun bharat news
Next Article