विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज ओटवणेत विविध कार्यक्रम
11:20 AM May 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मध्यरात्री केक कापून साजरा करणार वाढदिवस
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या गुरुवार २८ मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त ओटवणे येथे बुधवारी २७ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मध्यरात्री १२ वाजता विक्रांत सावंत यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री रवळनाथ विद्यामंदिर येथे महिलांसाठी सायंकाळी ७:३० वाजता हळदी-कुंकू कार्यक्रम, रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ (पावशी) यांचा 'यक्ष चंडिका युद्ध' हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ओटवणे महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement