For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पणजीत शिमगोत्सवानिमित्त सात दिवस विविधांगी कार्यक्रम

10:49 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजीत शिमगोत्सवानिमित्त सात दिवस विविधांगी कार्यक्रम

शिमगोत्सव मिरवणुकीच्या मार्गात बदल : जुने सचिवालय ते कांपालपर्यंत मिरवणूक,स्पर्धासाठी अकरा लाखांच्या बक्षिसांची खैरात

Advertisement

पणजी : पणजी शिमगोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 ते 31 मार्च या दरम्यान शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिमगोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमही घेण्यात आलेले असून, 30 मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे. आयोजन समितीतर्फे विविध प्रकाराच्या मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवलेली असून, 10 लाख 57 हजार 500 ऊपयांची एकूण बक्षिसे आहेत. तीन कलाकारांचा सन्मान करण्याबरोबरच चित्ररथ, रोमटामेळ व लोकनृत्य यांच्यासाठी फिरता चषक देण्यात येणार आहे, अशी माहिती धेंपो ग्रुपचे उद्योगपती तथा पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी दिली. पणजी शिमगोत्सव समितीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रनिवास धेंपो बोलत होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, सचिव शांताराम नाईक उपस्थित होते. चित्ररथ, रोमटामेळ इतर बक्षिसांची रक्कम मिळून धेंपो ग्रुपतर्फे 70 हजार ऊपये बक्षिसांसाठी देण्यात आलेली आहेत. उर्वरित रक्कम गोवा पर्यटन खात्यातर्फे बक्षिसाच्या स्वऊपात देण्यात येणार आहे. एकूण बक्षिसांची रक्कम 10 लाख 57 हजार 500 ऊपये असल्याचे श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले. राजधानी पणजीत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कामे सुरू असल्याने यंदा प्रथमच शिमगोत्सव मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. पार्किंग व्यवस्था व नागरिकांना शिमगोत्सव मिरवणूक पाहता यावी, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याचे समितीचे कार्याध्यक्ष मंगलदास नाईक यांनी सांगितले. पणजीतील शिमगोत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी 30 स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आले असून, पोलिसांबरोबरच त्यांचीही या कामी मदत होणार असल्याचे सचिव शांताराम नाईक यांनी सांगितले.

शिमगोत्सवातील बक्षिसे अशी

Advertisement

चित्ररथ स्पर्धा : 75 हजार ऊपये (प्रथम), 60 हजार ऊपये (द्वितीय), 50 हजार ऊपये (तृतीय), 45 हजार ऊपये (चतुर्थ), 40 हजार ऊपये (पाचवे). उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये 35 हजार ऊपये (प्रथम), 30 हजार ऊपये (द्वितीय), 25 हजार ऊपये (तृतीय), 20 हजार ऊपये (चतुर्थ), 15 हजार ऊपये (पाचवे). तसेच 10 हजार ऊपयांची 20 बक्षिसे दिली जाणार आहेत. रोमटामेळ स्पर्धा : 75 हजार ऊपये (प्रथम), 50 हजार ऊपये (द्वितीय), 40 हजार ऊपये (तृतीय), 30 हजार ऊपये (चतुर्थ), 20 हजार ऊपये (पाचवे). तर 5 हजार ऊपयांची 10 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. लोककला नृत्य स्पर्धा : 25 हजार ऊपये (प्रथम), 20 हजार ऊपये (द्वितीय), 15 हजार ऊपये (तृतीय), 10 हजार ऊपये (चतुर्थ), 8 हजार ऊपये (पाचवे) तर 5 हजार ऊपयांची 10 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये वेशभूषा स्पर्धेतील वरिष्ठ गटासाठी 10 हजार ऊपये (प्रथम), 7 हजार 500 ऊपये (द्वितीय), 5 हजार ऊपये (तृतीय), 4 हजार ऊपये (चतुर्थ), 3 हजार ऊपये (पाचवे). प्रत्येकी 2 हजार ऊपयांची 10 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. याच गटातील कनिष्ठ गटासाठी 5 हजार ऊपये (प्रथम), 4 हजार ऊपये (द्वितीय), 3 हजार ऊपये (तृतीय), 2 हजार ऊपये (चतुर्थ), 1 हजार ऊपये (पाचवे) तर 500 ऊपयांची 10 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Advertisement

फिरता चषकही देणार

चित्ररथ स्पर्धकांसाठी स्व. श्रीमती पुतू नाईक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, मंगलदास नाईक यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे. रोमटामेळ स्पर्धकांसाठी स्व. कृष्णा व्ही. नार्वेकर यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, किशोर नार्वेकर यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे. लोकनृत्य स्पर्धकांसाठी स्व. सुशिलाबाई अनंत नाईक यांच्या स्मरणार्थ फिरता चषक देण्यात येणार असून, सुनील नाईक यांनी हे बक्षीस पुरस्कृत केले आहे.

या कलाकारांचा होणार सन्मान

नाट्याकलेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अतुलनीय योगदान दिल्याबद्दल एकनाथ राजाराम परब, दयानंद गणेश राऊत, तित्रात्र कलाकार मथायश मास्कारेन्हास यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याने शिमगोत्सव समितीतर्फे या तिन्ही कलाकारांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सात दिवसांतील कार्यक्रम

25 मार्च रोजी पणजी शिमगोत्सव समितीतर्फे गुलालोत्सव 2024 होईल. यानिमित्त सकाळी 9 वाजता पणजी महालक्ष्मी देवीस नमन करून ढोल-ताशांच्या गजरात रोमटामेळ देवस्थानच्या प्रांगणातून पणजी आझाद मैदानाकडे निघेल. त्यानंतर 9.30 वाजता गुलालोत्सवास सुरवात होईल. 26 मार्च रोजी पणजी आझाद मैदानावर संध्याकाळी सात वाजता पारंपरिक नृत्यांनी बहरलेला संगीतमय कलाविष्कार ‘रंगी रंगला महाराष्ट्र’ हा कार्यक्रम होईल. 27 मार्च रोजी ‘काणी नव्या युगाची’ नाटक होईल. 28 मार्च रोजी ओमकार मॅलोडी ऑक्रेस्ट्रा होईल. 29 मार्च रोजी ‘चांदणे स्वरांचे’ हा मराठी भावगीते, भक्तीगीते, चित्रपट गीतांचा विविधरंगी कार्यक्रम होईल. 30 मार्च रोजी जुने सचिवालय ते कांपाल मैदान या मार्गावर शिमगोत्सव मिरवणुकीला सायंकाळी 4 वाजता प्रारंभ होईल. रात्री 10 वाजेपर्यंत चित्ररथ, रोमटामेळ आदी कार्यक्रम संपविण्यासाठी वेळेचे निर्बंध आहे. 31 मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता पणजी आझाद मैदानावर ‘तुमच्यासाठी कायपण’ हा कार्यक्रम होईल.

Advertisement
Tags :
×

.