बापट गल्ली भजनी मंडळातर्फे विविध कार्यक्रम
12:16 PM Nov 10, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : यावर्षीही बापट गल्ली भजनी मंडळाच्यावतीने काकड आरती, दीपोत्सव, दहीकाला,पालखी सोहळा व अवळी भोजन कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला. कोजागरी पौर्णिमेपासून सुरुवात झालेल्या काकड आरती कार्यक्रमात परिसरातील भक्त सकाळी पाच वाजता सहभागी होऊन भक्तिमय वातावरणात आनंद घेत होते. बापट गल्ली भजनी मंडळाचे कार्यकर्ते भक्तांना प्रसाद मिळावा यासाठी कार्यरत होते. वीणेकरी पुणेकर दादा आणि अध्यक्ष श्रीकांत सांबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस दिवसांच्या काकडारतीची रविवारी अवळी भोजनाने (महाप्रसाद) सांगता झाली. जवळपास हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी बापट गल्ली महिला मंडळ, सेवेकरी, पंच मंडळी, कार्यकर्ते आणि परिसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्यावतीने महेश पावले यांनी सर्वांचे आभार मानले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article