For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध आयपीओ होणार बाजारात सादर

06:09 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
विविध आयपीओ होणार बाजारात सादर
Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय शेअर बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात नव्या कंपन्यांचे आयपीओ सादर केले जाणार आहेत. गुंतवणूकीतून कमाईची संधी प्राप्त करायची असेल तर ही संधी या आठवड्यात प्राप्त करता येणार आहे. एसएमई गटामध्ये चार कंपन्यांचे आयपीओ सादर होणार आहेत. यापैकी तीन कंपन्यांचे आयपीओ एकाच दिवशी खुले होणार आहेत.

एनएफपी संपूर्ण फूड्स : ही कंपनी काजू प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असून यांचा आयपीओ 4 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 6 फेब्रुवारीला बंद होणार आहे. या आयपीओची इशू किंमत 52 ते 55 रु. प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. 44 लाख समभाग विक्रीतून कंपनी 24 कोटी रुपये उभारणार आहे. प्रत्येक लॉटमध्ये 2 हजार समभाग असतील, रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी 2 लॉट घ्यावे लागतील.

Advertisement

ग्रोव्हर ज्वेल्स : सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या या कंपनीचा आयपीओ 4 फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. आयपीओत गुंतवणूकदारांना 6 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओची इशू किंमत 83 ते 88 रु. प्रति समभाग अशी ठेवण्यात आली आहे. 38 लाख ताजे समभाग सादर करुन 33 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष कंपनीचे असेल. कंपनी घाऊक सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात असून डिझाइन व निर्मितीसह दागिने घाऊक बाजारासाठी तयार करत असते.

बायोपोल केमिकल्स: यांचा आयपीओ 6 फेब्रुवारीला खुला होऊन 10 फेब्रुवारीला बंद होणार आहे. 102 ते 108 रुपये प्रति समभाग अशी इशु किमत निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान 2400 समभाग खरेदी करावे लागणार आहेत. या आयपीओतून 31 कोटी रुपयांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. निधीचा वापर उद्योगासाठी जागा खरेदीसाठी, कर्ज फेडण्यासाठी व इतर कारणांसाठी केला जाणार आहे.

ब्रँडमॅन रिटेल : यांचा आयपीओ 4 फेब्रुवारी रोजी खुला होणार असून या आयपीओची इशु किंमत कंपनीने 155 ते 163 रु. प्रति समभाग अशी ठेवलेली आहे.

या कंपन्या होणार सुचीबद्ध

या आठवड्यात फक्त आयपीओ सादर होत नसून काही कंपन्या बाजारात सूचिबद्धही होणार आहेत. यामध्ये 2 ते 6 फेब्रुवारी या दरम्यान विविध कंपन्या बाजारात सूचिबद्ध होतील. यामध्ये हान्ना जोसेफ हॉस्पिटल, एमसेफ इक्विपमेंट, कस्तुरी मेटल कंपोझिट, कनिष्क अॅल्युमिनियम, एक्रिशन न्युट्रावेदा व सीकेके रिटेल मार्ट यांचा समावेश असणार आहे.

Advertisement
Tags :

.