झोळंबेत आज ,उद्या विविध कार्यक्रम
शिवशक्ती ग्रामविकास मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य
ओटवणे| प्रतिनिधी
झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार २९ व ३० नोव्हेंबर रोजी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी २९ डिसेंबर रोजी शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या सभागृहात रात्री ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर आवाज आर्ट इव्हेंट निर्मित ' रंग गीतांचा धुंद नृत्याचा' हा हिंदी व मराठी गीत, नृत्य, मिमिक्रीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे . रविवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मंडळाच्या शिवशक्ती व्यायाम शाळा सभागृहात श्री सत्यनारायण महापूजा, १२ वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ३: ३० वाजता शेतकरी मेळावा, संध्याकाळी ७ वाजता ग्रामस्थांचे भजन व त्यानंतर महिलांची फुगडी, रात्रौ ९ वाजता नटराज दशावतार नाट्य मंडळाच्या सहकार्याने प्रसिद्ध दशावतारी कलाकारांचा ' दैवयोग' हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.