उचगाव अडवी सिद्धेश्वर मठामध्ये श्रावण सोमवारनिमित्त विविध कार्यक्रम, महाप्रसाद
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील सुरवीर गल्लीमध्ये असलेल्या आडवी सिद्धेश्वर देवाच्या मठामध्ये श्रावण सोमवारनिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रम, महाआरती, अभिषेक, पूजा, तीर्थप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या श्रावण मासातील विविध कार्यक्रमांचा सांगता समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा मथुरा बाळकृष्ण तेरसे होत्या.
शेवटच्या श्रावण सोमवारी या सांगता समारंभात उचगाव ग्रा.पं.च्या सर्व सदस्यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, माजी सदस्य बी.एस.होनगेकर, सदानंद पावशे, मनोहर होनगेकर, दत्ता बेनके यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपस्थिताचे स्वागत महेश कुंडलकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा भगवे फेटे आणि पुष्पहार घालून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन एम. आर. कोवाडकर तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण देसाई यांनी मानले.