बिबवणे श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळा
12 ते 23 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम
कुडाळ -
बिबवणे - पळसेवाडी येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिरात श्री स्वामी गजानन महाराज सेवादायी प्रतिष्ठानच्यावतीने 15 वा प्रकट दिन सोहळा तसेच श्री शतचंडी याग व दत्त याग सोहळा 12 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत रोज पहाटे 5.30 वाजता काकड आरती, नित्य विधीवत पूजा ,अभिषेक आदी कार्यक्रम होणार आहेत.12 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री ची पादुका प्रदक्षिणा ( बिबवणे विठ्ठल - रखुमाई मंदिर, माटेश्वर मंदिर, महापुरुष मंदिर, गणपती मंदिर गिरोबा मंदिर ते गजानन महाराज मठ ) , दुपारी 1 वाजता आरती, महानैवेद्य, सायंकाळी 4 वाजता सत्यनारायण महापूजा,7 वाजता देवांना रूप, 7.30 वाजता आरती, महाप्रसाद, रात्री 8. 30 वाजता जय हनुमान दशावतार मंडळ (आरोस) यांचे वीर बब्रुवाहन नाटक, 13 रोजी सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, 11.30 वाजता श्रींची पादुका प्रदक्षिणा , दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता श्री शतचंडी याग प्रारंभ, 7 वाजता आरती, महाप्रसाद, रात्री 8 वाजता दत्तप्रसाद मंडळ ( नांदोस) यांचे भजन, 9 वाजता श्री तारादेवी फुगडी मंडळ (केळुस ) यांची फुगडी, 14 रोजी सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, आरती,दुपारी 1 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी 4 वाजता श्री शतचंडी याग ,रात्री नऊ वाजता श्री देवी पावणाई समई ग्रुप ( किंजवडे - देवगड ) यांचे समई नृत्य , 15 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा ,आरती दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता शतचंडी याग , रात्री 8 वाजता आरती, महाप्रसाद,9 वाजता कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम ( पिंगुळी गुढीपूर ) , 16 रोजी सकाळी 8 वाजता शतचंडी याग हवन प्रारंभ , दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद,3 वाजता हळदीकुंकू, सायंकाळी 4 वाजता घुमट आरती भजन (पेडणे - गोवा ) ,5 वाजता कुडाळ बाजारपेठ मित्र मंडळाचे भजन,7 वाजता आरती, महाप्रसाद, रात्री 8.30 वाजता कलेश्वर दशावतार मंडळ ( नेरुर,सुधीर कलिगण प्रस्तुत ) यांचे शतग्रीव संहार नाटक, 17 रोजी सकाळी 8 वाजता श्री शतचंडी याग, हवन, पूर्णाहुती, समाप्ती, दुपारी 1 वाजता आरती, महानैवेद्य, महाप्रसाद सायंकाळी 4 वाजता सातेरी आदर्श मंडळ (साटेली - भेडशी ) यांचे भजन, 7 वाजता आरती, महाप्रसाद ,रात्री 8 वाजता श्री देवी भवानी मंडळ (हुमरमळा ) यांचा गोंधळ, 18 रोजी सकाळी 8 वाजता श्री दत्त याग प्रारंभ, दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद ,सायंकाळी 5 वाजता पंचपदी माणगाव ,7 वाजता आरती, महाप्रसाद , रात्री 8 वाजता विनायक विठ्ठल कीर्तन विद्यालय ( झाराप) यांचे सोंगी लळीत कीर्तन , 19 रोजी सकाळी 8 वाजता श्री दत्तयाग प्रारंभ, दुपारी 1 वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी 6.30 वाजता भजन, हरिपाठ ( नामदेव तुकाराम वारकरी सेवा मंडळ ,नेमळे ) 7 वाजता आरती, महाप्रसाद, रात्री 9 वाजता शिवजयंती उत्सवानिमित्त बाल संभाजी व्यायाम मंडळ (तुळसुली )यांचे शिवकालीन दांडपट्टा व अन्य खेळ, 20 रोजी प्रकट दिन सोहळा सकाळी 8 वाजता श्री च्या मूर्तीवर लघुरुद्राभिषेक, श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी 12.30 वाजता आरती, महाप्रसाद, 3 वाजता चक्री कीर्तन प्रारंभ ,सायंकाळी 7 वाजता आरती, महाप्रसाद, रात्री 8.30 वाजता श्री दत्तमाऊली दशावतार मंडळ ( सिंधुदुर्ग ) यांचे मयुरेश्वर अर्थात भृशुंडी उद्धार, 21 रोजी सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12.30 वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता देवांना धूप, रात्री 8 वाजता गोपाळकाला - कीर्तनकार हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, 23 रोजी पहाटे सकाळी 8 वाजता महारुद्र स्वाहाकार , दुपारी 1.30 वाजता आरती,महाप्रसाद ,सायंकाळी 4 वाजता भजन, 7 वाजता आरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.उपस्थित राहवे असे आवाहन श्री स्वामी गजानन महाराज सेवादायी प्रतिष्ठान ( बिबवणे - पळसेवाडी ) यांच्यावतीने करण्यात आले आहे