For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हनुमान जयंतीनिमित्त अनगोळमध्ये विविध स्पर्धा

10:01 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
हनुमान जयंतीनिमित्त अनगोळमध्ये विविध स्पर्धा
Advertisement

बेळगाव : अनगोळ येथे मारुती गल्ली-मारुती मंदिर, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली तालीम तसेच मारुती मंदिर येथे पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जयंतीनिमित्त गावातील रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, हणमण्णावर गल्ली, झेरे गल्ली, लोहार गल्ल।r, भांदूर गल्ली येथील शोभेचे गाडे हलगीच्या ठेक्मयावर व गुलालाची उधळण करीत सजविलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली. नाथ पै नगर येथील मंडळाने आकर्षक रथ तयार केला होता. यावेळी सर्व मंडळांचे गाडे आपापल्या गल्लीतून फिरून त्यांनी हणमण्णावर गल्लीमार्गे मारुती गल्ली येथील मारूती मंदिराला भेट दिली. महालक्ष्मी मंदिर-गांधी स्मारक येथे श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभागाच्यावतीने गावातील सर्व मंडळांसाठी उत्कृष्ट हनुमान चित्ररथ स्पर्धा, उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा तसेच वाजंत्रींसाठी हलगी मजल स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस वितरण समारंभही पार पडला.

Advertisement

आकर्षक बैलजोडी निकाल : 1) गुंडप्पणावर बंधू-हणमण्णावर गल्ली, 2) मोहन बडमंजी-राजहंस गल्ली, 3) आनंद यल्लम्मणावर, 4) सुनील राघोजी-रघुनाथ पेठ, 5) रतन यल्लमण्णावर- रघुनाथ पेठ, हनुमान गाडा सजावट स्पर्धेचा निकाल : 1) लोहार गल्ली, 2) राजहंस गल्ली, 3) रघुनाथ पेठ, हलगी मजल स्पर्धा : 1) भांदूर गल्ली, 2) राजहंस गल्ली, 3) झेरे गल्ली यांनी पटकाविला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रवीण खर्डे, बाळू कुऱ्याळकर, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, मनोज चवरे, अभिजीत हुंदरे, चेतन बुद्धण्णावर, गुंडू गुंडप्पणावर, श्याम गौंडाडकर, मारुती बिद्रेवाडी व पंच कमिटीने परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.