For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दाणोलीत उद्या महाराजस्व शिबीराचे आयोजन

04:35 PM Aug 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दाणोलीत उद्या महाराजस्व शिबीराचे आयोजन
Advertisement

महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे होणार वाटप

Advertisement

सावंतवाडी -

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महसूल मंडळ मधील दाणोली बाजार येथे दिनांक ०४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबीराचे आयोजन श्री समर्थ साटम महाराज मंदिर येथे करण्यात आले आहे . सदर शिबिरात आंबोली मंडळ मधील आंबोली, गेळे, चौकुळ, केगद, नेने, मासुरे, दाणोली, देवसू, सातुळी, केसरी, फणसवडे, बावळाट, सांगेली, सावरवाड या गावातील ग्रामस्थांना महसूल विभागाकडील विविध दाखले वाटप करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबधित अर्जाशी निगडीत कागदपत्रांची माहिती देऊन परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमात १) पुरवठा पत्रिका वाटप २) संजय गांधी निराधार योजना मंजुर प्रकरणांचे वाटप ३) उत्‍पन्‍न दाखल्‍याचे वाटप ४) जातीच्‍या दाखल्‍यांचे वाटप ५) लक्ष्‍मी योजना लाभार्थ्याना ७/१२ वितरण ६) शेतकरी दाखले वितरण ७) अभिलेखातील दुरुस्‍तीसाठी कलम १५५ खालील दुरुस्‍तीचे आदेश व ७/१२ वितरण ८) राजपत्रानुसार ७/१२ अभिलेखात नावात बदल ९) ई पिकपहाणी १०) अॅग्रीस्‍टेक अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत होणार आहेत . तरी सदर शिबिरास वरील गावातील सर्व ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा कॉलेज यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आंबोली मंडळ अधिकारी संजय यादव , दाणोली ग्राम महसूल अधिकारी संतोष धोंड , आंबोली व चौकुळ ग्राम महसूल अधिकारी.संदीप मुळीक, , श्री. सचिन चितारे ग्राम महसूल अधिकारी सांगेली, श्रीम. सोनल जाधव ग्राम महसूल अधिकारी (केसरी) यांनी केलेले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.