For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

खानापूर तालुक्यात मतदान जागृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविणार

10:19 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात मतदान जागृतीसंदर्भात विविध उपक्रम राबविणार

ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी भाग्यश्री जहागीरदार यांची माहिती

Advertisement

खानापूर : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांत मतदान करण्याबाबत जागृतीसंदर्भात येत्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती तालुका स्वीप समितीच्या अध्यक्षा तसेच तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी भाग्यश्री जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. येथील खानापूर तालुका पंचायत सभागृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्या पुढे म्हणाल्या, गेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यात 70.68 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानांचा टक्का वाढावा यासाठी तालुक्यात मतदान जागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वीच स्वीप कमिटीतर्फे तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या आवारात सेल्फी स्टँड उभारणे, स्वाक्षरी संकलन मोहीम, पथनाट्या, मतदान प्रक्रियेचे भिंतीचित्राचे प्रदर्शन, तालुक्यात मतदान जागृतीसंदर्भात दुचाकी आणि तीनचाकी रॅली काढणे, मानवी साखळी उभारणे, कॅन्डल मार्च आदी उपक्रमांद्वारे उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात तालुक्यातील सर्व गावात मतदान जागृतीसाठी रांगोळी प्रदर्शन, मनरेगा कामगारांत मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे. तसेच सामूहिक योगासने, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, शालेय मुलांची पत्र चळवळ यासह विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खानापूर विधानसभा मतदारसंघात 2,17,171 मतदार आहेत. त्यात अपंग मतदार 3600 असून यात पुरुष 2331 तर महिला 1269 आहेत. तर 85 वयावरील 1636 मतदार आहेत. यात पुरुष 608 तर महिला 1028 आहेत. तालुक्यात नवीन मतदारांची संख्या 5620 असून यात पुरुष 3016 तर महिला 2603 आहेत. तालुक्यातील मतदान केंद्रांतून सुरळीत मतदान होण्यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत योग्य नियोजन सुरू असून प्रत्येक मतदान केंद्र अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही मतदान केंद्रांची रचना वैशिष्ट्यापूर्ण करण्यात येणार आहे. यात लेंढा कन्नडा हायर प्रायमरी स्कूल, उर्दू बॉईज स्कूल खानापूर, गव्ह. कन्नडा स्कूल प्रभूनगर, गव्ह. स्कूल इटगी, बिस्टव्वा सेकंडरी स्कूल कक्केरी ही पाच सखी मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. तर भुरुणकी येथील उर्दू शाळेत वैशिष्ट्यापूर्ण मतदान केंद्र 1, तर युवा मतदान केंद्र म्हणून सरकारी कन्नडा शाळा केरवाड तसेच पारंपरिक मतदान केंद्र म्हणून किरावळे येथील मराठी शाळेत मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. तर बिडी येथील कन्नडा शाळेत थीमवर आधारित मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी वाय. एम. माविनकाई, प्रल्हाद गुंडपीकर, अश्पाक चांदकन्नावर आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.