वर्धमान स्टीलला 34 कोटींचा नफा
06:11 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
प्रमुख धातू क्षेत्रातील कंपनी वर्धमान स्पेशल स्टिल लिमीटेड यांचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून 34 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने कमविला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये नफा 72 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत कंपनीने 19.7 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
सदरच्या तिमाहीत 7 टक्के वाढीसह कंपनीने 458 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी 428 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. तिमाही निकालानंतर कंपनीचा समभाग शेअरबाजारात
Advertisement
मंगळवारी 12 टक्के इतका दमदार तेजीसह 306 रुपयांवर पोहोचला होता. कंपनीचे बाजार भांडवलमूल्य 2639 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Advertisement