भारत टॅलेंट सर्च परिक्षेत वरदा सामंत जिल्ह्यात प्रथम
वेंगुर्ले(वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी वरदा वासुदेव सामंत (इयत्ता सातवी) हिने भारत टॅलेंट सर्च (BTS) या राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. एज्युकेटेड अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार एफ एल एन ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व अपेक्षित अध्ययन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून या परीक्षेचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा म्हणून आयोजन केले जाते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत वरदा वासुदेव सामंत या विद्यार्थिनीने विशेष प्राविण्यासह राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २२ वा, जिल्ह्यात प्रथम व सावंतवाडी केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल वरदा, तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षिका तेजश्री सावंत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.