वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद
07:40 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ खेड
Advertisement
पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. या मार्गावरील वारवंड ते उंबर्डेदरम्यान एकाच रात्री 4 ते 5 ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे वाहनांसह प्रवासी अडकून पडले होते.
संभाव्य जीवितहानी दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून 31 ऑगस्टपर्यंत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात किंवा पुणेच्या दिशेने प्रवास करताना राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement