तालुका स्पर्धेत वनिता विद्यालय विजेता
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल 14 वर्षांखालील स्पर्धेत वनिता विद्यालय संघाचा बालिका आदर्श संघाने तर 17 वर्षांखालील मुलींच्या गटात वनिता विद्यालयाने लिटल स्कॉलर्स संघाचा पराभव करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षांखालील प्राथमिक गटात झालेल्या अंतिम सामन्यात बालिका आदर्शने वनिता विद्यालयचा 15-10, 15-13 अशा गुण फरकाने पराभव केला. वनिता विद्यालय संघातील 5 खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. त्यामध्ये रफित सनदी, प्रवीणा कुमार, ममता प्रजापत, आराध्य नाईक, अश्रा सौदागर या खेळाडूंचा समावेश आहे. माध्यमिक गटात अंतिम सामन्यात मुलींच्या विभागात वनिता विद्यालयाने लिटल स्कॉलर्स कणबर्गीचा 15-4, 15-6 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. या संघात नेहू बेपारी, दानिया बागेवाडी, रेवती नाईक, प्राची मराठे, अल्बा बेपारी, सान्वी शेख, अल्फा सौदागर यांचा समावेश आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे. या संघाला वनिता विद्यालयाच्या प्राचार्या जोस्पीन गुंटी, प्रशिक्षक नागराज भगवंतण्णवर, नेहा देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.